लाचखोर वाहतूक पोलिसाची महिलेस भरचौकात मारहाण!

By Admin | Updated: May 12, 2015 02:56 IST2015-05-12T02:56:23+5:302015-05-12T02:56:23+5:30

लाच दिली नाही म्हणून वाद घालत एका हेड कॉन्स्टेबलने एका महिलेला विटेने मारहाण केल्याची संतापजनक घटना दिल्लीच्या गोल्फ लिंक्स भागात घडली आहे.

Crude transport police woman suffocated! | लाचखोर वाहतूक पोलिसाची महिलेस भरचौकात मारहाण!

लाचखोर वाहतूक पोलिसाची महिलेस भरचौकात मारहाण!

नवी दिल्ली : लाच दिली नाही म्हणून वाद घालत एका हेड कॉन्स्टेबलने एका महिलेला विटेने मारहाण केल्याची संतापजनक घटना दिल्लीच्या गोल्फ लिंक्स भागात घडली आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या पोलिसाला अटक करून तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे दिल्ली पोलिसांचे क्रौर्य पुन्हा एकदा उघड झाले आहे.
सतीश चंद्र असे या क्रूर हेड कॉन्स्टेबलचे नाव असून तो दिल्ली पोलिसांच्या वाहतूक शाखेत कार्यरत आहे. महिला आणि तिच्या दोन मुलांवर विटेने हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आपल्या दोन मुलांसह दुचाकीने जात असताना सतीशचंद्रने तिला रोखले आणि वाहतूक नियमांचा भंग केल्याचा आरोप करीत २०० रुपयांची लाच मागितली. महिलेने लाच देण्यास नकार दिल्यावर त्याने हुज्जत घातली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने वीट उचलून महिलेला तिच्या मुलांदेखत मारहाणही केली.

 

Web Title: Crude transport police woman suffocated!