शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CRPF जवानानेच केली पुतळ्याची विटंबना, सीसीटीव्हीतून झालं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 16:41 IST

35 वर्षीय सेंथिल कुमार याला स्क्रिझोफेनियाचा आजार जडला आहे.

चेन्नई: काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या पुडूकोट्टणी येथे पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले होते. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर समाजातील अनेक स्तरांवरून टीका झाली होती. परंतु, आता या प्रकरणात एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना समाजकंटकांनी नव्हे तर सीमा सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) सेंथिल कुमार या जवानाने केली होती. या जवानाला पोलिसांनी अटक केली आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सेंथिल कुमार पुतळ्याच्या चबुतऱ्यावर चढून पेरियार यांच्या पुतळ्याच्या डोके तोडताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर सेंथिल कुमारने पुतळ्याचे डोके जवळच्या चौकात फेकून दिल्याचेही सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध झाले आहे. पोलीस चौकशीदरम्यान सेंथिल कुमारनेही आपण दारूच्या नशेत पुतळ्याची तोडफोड केल्याची कबुली दिली. दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर CRPF कडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार 35 वर्षीय सेंथिल कुमार याला स्क्रिझोफेनियाचा आजार जडला आहे. त्याच्यावर गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरू होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित करण्यात आल्याचेही CRPF कडून सांगण्यात आले.  

टॅग्स :BJPभाजपाTamilnaduतामिळनाडू