फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 22:19 IST2016-01-24T22:19:51+5:302016-01-24T22:19:51+5:30

जळगाव : फळांची गाडी लावण्यावरुन रविवारी फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी होऊन एक जण जखमी झाला. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Crowds in Fruit Vendors | फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी

फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी

गाव : फळांची गाडी लावण्यावरुन रविवारी फळ विक्रेत्यांमध्ये हाणामारी होऊन एक जण जखमी झाला. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शिवाजी रोडजवळील फळ गल्लीमध्ये फळांची गाडी लावण्यावरुन असलम जहागीर खान (३५), अब्दुल जहागीर खान (२३), फिरोज जहागीरखान (२०), एजाज गुलाब बागवान (२४), सादीक बागवान (२८) यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. तेथे तडजोड होऊन सर्व जण जाण्यासाठी बाहेर निघाले. मात्र पुन्हा त्यांच्यामध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यामध्ये सादीक बागवान हे जखमी झाले.
या प्रकरणी पाचही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

Web Title: Crowds in Fruit Vendors