शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन धुडकावून रथोत्सवासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 23:54 IST

चितापूर येथील सिद्धलिंगेश्वर मंदिरामध्ये रथोत्सवासाठी काही भाविक उपस्थित होते. लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक उपक्रम तसेच धार्मिक सोहळे आयोजिण्यास बंदी आहे

बंगळुरू : कोरोना साथीचा फैलाव होऊ नये म्हणून लागू केलेल्या लॉकडाउनचे नियम धुडकावून कर्नाटकमधील कलबुर्गीनजिकच्या चितापूर येथील मंदिर परिसरात रथोत्सवासाठी शंभर-दीडशे भाविक गुरुवारी सकाळी जमले होते. पोलिसांनी २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे.

चितापूर येथील सिद्धलिंगेश्वर मंदिरामध्ये रथोत्सवासाठी काही भाविक उपस्थित होते. लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक उपक्रम तसेच धार्मिक सोहळे आयोजिण्यास बंदी आहे. तरीदेखील सिद्धलिंगेश्वर मंदिराच्या परिसरात रथोत्सव पार पडला. कलबुर्गी परिसरात कोरोनाचे आतापर्यंत १७ रुग्ण आढळून आले असून त्यातील तिघे मरण पावले आहेत. चितापूर येथे सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या भाविकांमुळे या परिसरात कोरोना साथीचा आणखी फैलाव होण्याची भीती आहे. कर्नाटक मध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. लॉकडाउनचे अतिशय कडक पालन केले जात आहे असे तेथील भाजप सरकार सांगत असले तरी त्याच पक्षाच्या एका आमदाराने स्वत:च्या निवासस्थानी शेकडो लोकांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर आता हा चितापूरचा प्रकार घडला आहे.मंदिराजवळ गुरुवारी सकाळी भाविक जमा झाले. या देवतेचा रथ त्यातील काही भाविकांनी विशिष्ट अंतरापर्यंत ओढून नेला. हा धार्मिक सोहळा सिद्धलिंगेश्वर देवस्थानाच्या समितीने आयोजिला होता की धार्मिक सोहळ््यांच्या आयोजनावर सध्या बंदी असूनही भाविकांपैकीच कोणीतरी पुढाकार घेतला याचा आम्ही शोध घेत आहोत, असे कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक लॅडा मार्टिन यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस