पिरवाडी किनार्यावर पर्यटकांची गर्दी
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:44+5:302015-06-15T21:29:44+5:30
उरण : उन्हाळा असो वा पावसाळा कोणताही ऋतू असो निसर्गाचे सौंदर्य लाभलेल्या उरण येथील पिरवाडी समुद्र किनार्यावर पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते.

पिरवाडी किनार्यावर पर्यटकांची गर्दी
उ ण : उन्हाळा असो वा पावसाळा कोणताही ऋतू असो निसर्गाचे सौंदर्य लाभलेल्या उरण येथील पिरवाडी समुद्र किनार्यावर पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते. अनेक वर्षांपूर्वी या समुद्रकिनारी एका मुस्लीम समाजातील संताचे येथे वास्तव्य होते. त्यांच्याच नावाने हा समुद्रकिनारा पिरवाडी (पिरबाबा) म्हणून संबोधला जातो. आजही त्या संताची समाधी समुद्रकिनारी मस्जिदजवळ आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबईतून हजारो लोक समाधीस्थळ पाहण्यासाठी येथे गर्दी करतात. येथे मासेमारी करणारे लोक समुद्रात मासेमारी करतात तेव्हा पर्यटक त्यांच्याबरोबर मासेमारीचा आनंद लुटतात. सध्या मासेमारी बंदी असली तरी निसर्गाचा आनंद लुटणार्या पर्यटकांची येथे कमी नाही. सहकुटुंब पर्यटक येथे येवून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. शाळा, कॉलेजमधील सहलीसाठी पहिली पसंती उरणमधील पिरवाडीलाच मिळते. रविवारी आणि सुटीच्या दिवशी येथे या पर्यटकांची गर्दी दिसून येते. (वार्ताहर)