मुल्हेर किल्ल्यावरील शिवमंदिरात गर्दी

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:21+5:302015-09-01T21:38:21+5:30

शासनाचे दुर्लक्ष : परिसर सुधारण्याची सर्वत्र मागणी

The crowd at Shiv Temple in Mulher Fort | मुल्हेर किल्ल्यावरील शिवमंदिरात गर्दी

मुल्हेर किल्ल्यावरील शिवमंदिरात गर्दी

सनाचे दुर्लक्ष : परिसर सुधारण्याची सर्वत्र मागणी
निकवेल : बागलाण तालुक्यातील मुल्हेर किल्ला विकासापासून वंचित असल्याने या किल्ल्यावरील देव-देवतांच्या मंदिराचा जीणार्ेद्धार होण्याची अत्यंत गरज असल्याची भावना अनेक भाविकांनी केली आहे.
मुल्हेर किल्ल्यावर विविध प्रकाराच्या राजा, राजवटीच्या काळातल्या वस्तू आजपावेतो आहेत. त्यामध्ये विविध देव-देवतांची मंदिरे, मूर्ती आहेत. त्यात श्रावणी सोमवार (दि. ३१)असल्याने तेथील सोमेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक आले होते. सदर किल्ल्यावर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय नसल्याने भाविकांना ५ ते ६ किलोमीटर जंगलामधून पायपीट करावी लागत आहे.
येथील सोमेश्वर मुल्हेर किल्ल्यावरील सोमेश्वर (महादेव मंदिर) हे जागृत देवस्थान मानले जाते. सदर मंदिर हे घनघाट जंगलामध्ये असून मंदिराकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे; मात्र या रस्त्यावरून कुठलेही वाहन जात नाही, पायी गेल्यास सुमारे ८ किलोमीटर चालावे लागते. मुल्हेर किल्ल्याची सद्यस्थिती पाहता विकास होणे फार गरजेचे आहे. सदर मुल्हेर किल्ल्यावर विविध पुरातन संग्रह आहे. त्यात तोफा, दरवाजा, पायर्‍या, विहीर, हत्ती टाका, मोती टाका, टाक देवीची मूर्ती, राजवाडा, रामेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, चंदन विहीर, गणेश मंदिर, तलाव, गुहा, तटबंदी गुहा, भडंगनाथ मंदिर, मोरागड आदि पुरातन वस्तू तसेच मंदिर, राजाचा राजवाडा आदि ठिकाणे सदर किल्ल्यावर बघण्यास मिळतात. तेथील तलावात आजही मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध आहे. महादेव मंदिर आकर्षक असून शिवलिंग दर्शनासाठी १० ते १५ फूट खाली उतरून जावे लागते; मात्र मंदिरामध्ये विद्युत रोषणाई नसल्याने भाविकांना दर्शनासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. तरी शासनाने मुल्हेर किल्ल्यावर लक्ष केंद्रित करून मुल्हेर किल्ला हा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.
(वार्ताहर)


चौकट
मंदिराची स्थापना १४८० साली महादेवशहा राठोड बागुल राजाने स्थापना केली. सोमेश्वरच्या आशीर्वादाने त्याला भैरवशहा हा पराक्रमी मुलगा झाला. त्यानंतर मंदिराचे बांधकाम हे सर्व दगड एकमेकांत गुंफून मंदिर उभे केले असल्याचे बोलले जाते.

Web Title: The crowd at Shiv Temple in Mulher Fort