महाशिवरात्रीनिमित्त धायरीत भाविकांची गर्दी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:12+5:302015-02-18T00:13:12+5:30

महाशिवरात्रीनिमित्त धायरीत भाविकांची गर्दी
>धायरी : महाशिवरात्रीनिमित्त येथील धायरेश्वर मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. दर्शन बारीची व्यवस्था केल्याने हजारो भाविकांना सुलभतेने दर्शन घेता आले. श्री धारेश्वर महादेव संस्थानने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. संपूर्ण मंदिर परिसरात छोटी यात्राच भरली होती. मुलांची खेळणी, भाजीपाला, धार्मिक पुस्तके व मिठाईचे स्टॉल लागले होते. पोलिसांचा बंदोबस्त चोख होता. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुणे शहर व परिसरातील लाखांवर भाविकांनी रात्री उशिरापर्यंत दर्शन घेतले. ०००००