बेडवर नोटांचे बंडल पडलेले आहेत. अधिकारी बसलेले आहेत आणि पैसे मोजत आहेत. एखाद्या सिनेमातील दृश्य वाटावे असा हा व्हिडीओ कर्नाटकातील आहे. लोकायुक्त पोलिसांनी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली. तेव्हा तब्बल दोन कोटी रुपयांची संपत्ती मिळाली. यात एक कोटी ७ हजार रुपये रोख मिळाले आहेत.
कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी बंगळुरूमध्ये ही कारवाई केली. एका शासकीय अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून पोलिसांनी दोन कोटींची मालमत्ता जप्त केली.
कर्नाटक निवासी शैक्षणिक संस्था सोसायटीतील अधीक्षक अभियंता असलेल्या एच.एम. जनार्दन यांच्याशी संबंधित सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. जनार्दन यांच्या जवळचा मित्र सुजय शेट्टी याच्या घरात १.७ कोटी रुपये रोख रक्कम मिळाली.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बेडवर बसून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पैसे मोजत आहे. त्यासाठी मशीनही आणण्यात आले होते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अधीक्षक अभियंता असलेल्या जनार्दन यांच्याकडे ४.४२ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे तपास आढळून आले आहे. ही संपत्ती त्यांच्या उत्पन्नांच्या तुलनेत २१६ टक्के जास्त आहे. झाडाझडती आणि तपास अभियान अजूनही सुरू आहे. यातून अधिक संपत्तीची माहिती मिळण्याचीही शक्यता आहे.
Web Summary : Karnataka engineer's home raided; ₹2 crore assets seized, including ₹1.7 crore cash. Lokayukta found disproportionate assets worth ₹4.42 crore, 216% above income. Raids continue; documents seized.
Web Summary : कर्नाटक में इंजीनियर के घर पर छापा; 2 करोड़ रुपये की संपत्ति जब्त, जिसमें 1.7 करोड़ रुपये नकद शामिल हैं। लोकायुक्त ने 4.42 करोड़ रुपये की अनुपातहीन संपत्ति पाई, जो आय से 216% अधिक है। छापे जारी; दस्तावेज जब्त।