गुजरात मुख्यमंत्र्यांसाठी कोटींचे विमान

By Admin | Updated: June 23, 2014 04:52 IST2014-06-23T04:52:06+5:302014-06-23T04:52:06+5:30

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल लवकरच १०० कोटी रुपयांच्या विमानात उडणार आहेत. राज्य सरकार त्यांच्यासाठी खास नवीन विमान खरेदी करणार आहे.

Crores of aircraft for chief ministers of Gujarat | गुजरात मुख्यमंत्र्यांसाठी कोटींचे विमान

गुजरात मुख्यमंत्र्यांसाठी कोटींचे विमान

गांधीनगर (गुजरात) : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल लवकरच १०० कोटी रुपयांच्या विमानात उडणार आहेत. राज्य सरकार त्यांच्यासाठी खास नवीन विमान खरेदी करणार आहे.
त्याचे कारण असे की, गुजरात मुख्यमंत्र्यांचे १५ वर्षे जुने नऊ आसनी ‘सुपर किंग एअरबीच क्राफ्ट २००’ हे विमान यावर्षी रिटायर होत आहे. डिसेंबर २०१४ मध्ये या विमानाच्या वापराचे आयुष्य संपणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी १९९९ साली १९.१२ कोटी रुपये खर्चून एका एजंटच्या माध्यमाने हे विमान खरेदी केले होते. त्यावेळी नियंत्रक आणि महालेखाकारांनी विमान खरेदीच्या या प्रक्रियेवर टीकासुद्धा केली होती. या विमानाचे आयुष्य यंदा संपत आहे. यात वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे मुख्यमंत्री आणि इतरही व्हीव्हीआयपींना अनेकदा खासगी विमानाने प्रवास करण्याचा प्रसंग आला.
या विमानाचे रिटायरमेंट लक्षात घेऊन उच्चस्तरीय तांत्रिक समितीने अत्याधुनिक सुविधा आणि नागरी उड्डयण महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सुरक्षा मापदंडात खरे उतरणारे १२ ते १५ आसनी विमान खरेदी करण्याची शिफारस केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Crores of aircraft for chief ministers of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.