शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

क्रोनीजीवी... देश विकायला निघालाय तो, आंदोलनजीवीवरुन राहुल गांधींचा टोला

By महेश गलांडे | Updated: February 10, 2021 15:46 IST

संसद सभागृहात शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलत असताना मोदींनी आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला. त्यावरुन सध्या देशभरात राजकारण तापलं आहे.

ठळक मुद्दे राहुल गांधींनी केवळ एक ट्विट करुन मोदींनी क्रोनीजीवी असं म्हटलंय. क्रोनी म्हणजे मैत्रीजीवी... असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना टोला लगावलाय. तसेच, देश विकायला लागलाय तो... असे म्हणत राहुल गांधांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केलीय

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावपर आभार प्रदर्शनाचे भाषण करताना विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही मोदींनी आपलं मत मांडलं. शेतकरी आंदोलनामध्ये काही आंदोलनजीवी लोक घुसले आहेत, आंदोलनजीवी नावाची नवीन जमातच अस्तित्वात आल्याचं मोदींनी म्हटलं. त्यावरुन, मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलंय. आता, माजी केद्रीयमंत्री शशी थरुर यांनीही ट्विट करुन आंदोलनजीवी या शब्दावरुन भाजपाला खोचक टोला लगावला होता. त्यानंतर, आता काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनीही मोदींवर आंदोलनजीवी शब्दावरुन टीका केलीय.   

संसद सभागृहात शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलत असताना मोदींनी आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला. त्यावरुन सध्या देशभरात राजकारण तापलं आहे. राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनातील नेते योगेंद्र यादव यांनी आंदोलनजीवी शब्दावरुन मोदींवर जोरदार निशाणा साधला. तर, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि शशी थरुर यांनीही या शब्दाचा समाचार घेतला आहे. आता, राहुल गांधींनी पहिल्यांदाच आंदोलनजीवीवरुन मोदींना टोला लगावलाय.

राहुल गांधींनी केवळ एक ट्विट करुन मोदींनी क्रोनीजीवी असं म्हटलंय. क्रोनी म्हणजे मैत्रीजीवी... असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना टोला लगावलाय. तसेच, देश विकायला लागलाय तो... असे म्हणत राहुल गांधांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केलीय. केंद्र सरकारने विमानतळांचे खासगीकरण, एलआयसीमध्येही भागिदारी यांसारखे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे, राहुल गांधींनी मोदी हे मित्रांसाठी देश विकायला लागलेत, असे सुचविण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींनी यापूर्वीही अनेकदा अदानी आणि अंबानी याचं नाव घेऊन मोदींवर जाहीरपणे टीका केलीय.     

शशी थरुर यांनीही लगावला टोला

बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? असा खोचक प्रश्न शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे. मोदींनी संसदेत आंदोलनजीवी या शब्दाचा उत्सुकतेनं उल्लेख केला. पण, या आंदोलकांसाठी हा शब्द निष्ठूर नाही का? असे ट्विट थरुर यांनी केली आहे. दिल्लीतील जनलोकपाल आंदोलनाचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे. त्यामुळे, या आंदोलनातील प्रमुख अण्णा हजारे, किरण बेदी आणि बाबा रामदेव यांच्या सहभागावरुन थरुर यांनी हा टोमणा मारणारे ट्विट केलंय.

काय म्हणाले होते पंतप्रधान

आम्ही 'बुद्धीजीवी' हा शब्द ऐकला होता. परंतु आता काही लोकं 'आंदोलनजीवी' झाले आहेत. देशात काहीही झालं की ते त्या ठिकाणी पोहोचतात. कधी ते पडद्याच्या मागे असतात तर कधी पुढे. अशा लोकांना ओळखून आपल्यालाला त्यांच्यापासून वाचायला हवं, असं म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी निशाणा शाधला. "जे आंदोलनजीवी लोकं आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. परंतु कोणाचं आंदोलन सुरू असेल तर ते त्या ठिकाणी पोहोचतात. ही लोकं कोणत्याही ठिकाणी सापडतात. वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही," असंही मोदी म्हणाले. सध्या नवा FDI आला आहे. त्या 'फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी'पासून आपल्याला वाचलं पाहिजे, असंही आंतरराष्ट्रीय कटाबद्दल बोलताना मोदींनी नमूद केलं. 

संजय राऊत यांचा निशाणा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युतर दिलंय. विशेष म्हणजे गर्व से कहो हम हिंद है... या घोषवाक्याचं रुपांतरच त्यांनी आंदोलनजीवी या शब्दाशी जोडून केलंय. त्यामुळे, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न राऊत यांनी केलाय. राऊत यांनी ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टीकैत यांच्या समवेतचा फोटो शेअर केला आहे. तसेच, गर्व से कहो हम आंदोलनजीवी है... जय जवान- जय किसान असेही राऊत यांनी म्हटलंय. तसेच, मराठीतही याच आशयाचे ट्विट राऊत यांनी केलंय.

आंदोलनजीवीवरुन अमोल कोल्हेंचा भाजपाला चिमटा

देशाला आजतर दोन नवे शब्द मिळाले आहेत, त्यातला एक आहे आंदोलनजीवी. मी या शब्दाबद्दल अतिशय आभारी आहे.कारण महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते,त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं. पण, ज्या कष्टकरी वर्गासाठी बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही ठामपणे उभे राहतात, ते मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे, त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाTwitterट्विटर