क्रॉम्प्टन ग्रीव्हज्मध्ये उत्पादनाला सुरुवात संप मिटला : कामगार संघटना मान्यतेच्या वादावर न्यायालयच अंतिम निर्णय घेणार
By Admin | Updated: August 23, 2015 00:04 IST2015-08-22T00:43:28+5:302015-08-23T00:04:37+5:30
सातपूर : कामगार संघटनेच्या वादावरून दोन डाव्या चळवळीतील संघटनांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अंबडमधील क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ सुरू असलेला संप अखेर मिटला आहे. सीटू प्रणीत संघटनेला मान्यता देण्यासंदर्भात न्यायालय देईल तो निर्णय मान्य करण्याचा तोडगा उभयतांनी मान्य केल्याने क्रॉम्प्टनची चाके फिरू लागली. सायंकाळी सात वाजता कंपनीत उत्पादनही सुरू झाले आहे.

क्रॉम्प्टन ग्रीव्हज्मध्ये उत्पादनाला सुरुवात संप मिटला : कामगार संघटना मान्यतेच्या वादावर न्यायालयच अंतिम निर्णय घेणार
सातपूर : कामगार संघटनेच्या वादावरून दोन डाव्या चळवळीतील संघटनांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अंबडमधील क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ सुरू असलेला संप अखेर मिटला आहे. सीटू प्रणीत संघटनेला मान्यता देण्यासंदर्भात न्यायालय देईल तो निर्णय मान्य करण्याचा तोडगा उभयतांनी मान्य केल्याने क्रॉम्प्टनची चाके फिरू लागली. सायंकाळी सात वाजता कंपनीत उत्पादनही सुरू झाले आहे.
कामगार उपआयुक्त कार्यालयात कामगार उपआयुक्त एस. आर. जाधव यांनी घेतलेली बैठक अखेरीस यशस्वी ठरली. शुक्रवारी सुमारे सात तास मॅरेथॉन बैठक झाल्यानंतर अखेरीस हा वाद मिटला. गेल्या १०३ दिवसांपासून हा संप सुरू होता. सुमारे पाचशे कामगार असलेल्या या कारखान्यात सुरुवातीपासून आयटक प्रणीत कामगार संघटना मान्यता प्राप्त आहे. परंतु गेल्या वर्षी सीटूचे सभासदत्व स्वीकारलेल्या कामगारांनी आधी वेतन करारास विरोध आणि तद्नंतर मान्यतेच्या विषयावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सीटूच्या सभासदत्व स्वीकारलेल्या कामगारांनी संपाची नोटीस दिल्यानंतर काम बंद आंदोलन सुरू होते. कामगार संघटनेच्या मान्यतेसंदर्भात औद्योगिक न्यायालयात दावा प्रविष्ट आहे. त्यामुळे यासंदर्भात आता न्यायालयाचा निर्णय अंतिम ठरेल असे ठरल्याचे कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी सांगितले. अर्थात, या विषयावर खूपच चर्चा झाली नसल्याचे वृत्त आहेे. कंपनी व्यवस्थापनाने निलंबित केलेल्या २७ कामगारांना कामावर रूजू करून घेऊन घ्यावे; मात्र त्यांची सुरू असलेली चौकशी पूर्ण करावी, संबंधित कामगार दोषी आढळल्यास त्यांना सौम्य शिक्षा करावी, असेही ठरविण्यात आले.
कामगार संघटनेच्या मान्यतेच्या विषयावरून हा विषय असला तरी क्रॉम्प्टन व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा संप मिटवण्यासाठी अनेक बैठका झाल्या त्यावेळी क्रॉम्प्टनचे अधिकारी उपस्थित नव्हते. मध्यंतरी निमा, आयमाचे पदाधिकारी आणि सीटूचे नेते यांच्यात बैठक झाली तेव्हा नाशिकमध्ये क्रॉम्प्टनचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले होते. त्यानंतर निमा, आयमाच्या पदाधिकार्यांनी यासंदर्भात कामगार उपआयुक्तांना साकडे घातल्यानंतरही बैठक घेण्यात आली. या बैठकीस क्रॉम्प्टनचे अधिकारी शशी रंजन, अलोक खरे, मंगेश वागळे, अक्षय सिक्वेरा, सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड तसेच निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मनीष कोठारी, एच.आर.आय.आर. समितीचे अध्यक्ष मोहन पाटील, आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे,
जोड