आघाडी सरकारवर मुनगंटीवार यांची टीका
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:08+5:302015-02-18T23:54:08+5:30
नागपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला बजावलेल्या नोटीसवरून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर टीका केली आहे.

आघाडी सरकारवर मुनगंटीवार यांची टीका
न गपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला बजावलेल्या नोटीसवरून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर टीका केली आहे.नागपूर येथे ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत वाटपाच्या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, यासाठी मागील सरकार दोषी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी दीर्घकालीन योजनांची गरज होती. मात्र आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहे. (प्रतिनिधी)