शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार बनवितात अश्लील छायाचित्रे! ‘एआय’द्वारे मुलांचे लैंगिक शोषण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 07:40 IST

‘एआय’चा वापर मानवी हितासाठी झाला पाहिजे.

लंडन : ‘एआय’चा वापर मानवी हितासाठी झाला पाहिजे. मात्र, असे तंत्रज्ञान विकृत लाेकांच्या हाती पडले की अनेक धाेके निर्माण हाेतात. असाच एक धाेका म्हणजे, ‘एआय’चा वापर करून लहान मुलांचे अश्लील छायाचित्रे तयार करून त्यांचे लैंगिक शाेषण करण्याचे प्रमाण वाढत आहे. इंटरनेट वाॅच फाउंडेशन (आयडब्ल्यूएफ) नावाच्या संस्थेने याबाबत अलर्ट दिला आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारची संवेदनशील माहिती असलेली लाखाे पेजेस इंटरनेटवरून हटविण्यात आली आहेत. 

‘एआय’ वापरून गुन्हेगार लहान मुलांची अश्लील छायाचित्रे इंटरनेटवर शेअर करत आहेत. त्यावर ‘आयडब्ल्यूएफ’ने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. 

२२ लाख वेब पेजेस हटविले

‘आयडब्ल्यूएफ’ने वर्ष २०२२ मध्ये इंटरनेटवरून अशा प्रकारची तब्बल २२ लाख वेब पेजेस हटविली आहेत. त्यावर मुलांची छायाचित्रे होती. 

त्यांना जाळ्यात अडकविण्यासंबंधी गुन्हेगारांचे काॅलदेखील रेकाॅर्ड केले आहेत. त्यात ‘एआय’वरून मुलांची अधिकाधिक जिवंत छायाचित्रे कशी काढता येतील, याबाबत सांगण्यात येत हाेते.

कोण आहे ‘आयडब्ल्यूएफ’?

ही संघटना इंटरनेटवरील आक्षेपार्ह माहिती हटविते. या संघटनेला लहान मुलांच्या लैंगिक शाेषणाशी संबंधित माहितीवर लक्ष ठेवण्याचा परवाना मिळाला आहे. मुलांच्या शाेषणाबाबत अशा प्रकारची छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्याचा एक ट्रेंड आम्ही पाहिला. त्यातून मुलांवर त्यांची छायाचित्रे पाठविण्यासाठी दबाव टाकण्यात येताे. असा प्रकार भविष्यात वाढणार आहे.- सुजी हरग्रीव्ह्ज, सीईओ, ‘आयडब्ल्यूएफ’

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी