गुन्हे वार्ता...
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30
व्यापाऱ्यासह दोघांचे ९६ लाख लंपास

गुन्हे वार्ता...
व यापाऱ्यासह दोघांचे ९६ लाख लंपासनागपूर : चोरट्यांनी मोबाईल व्यापाऱ्यासह दोन नागरिकांचे ९६ लाख रुपये लंपास केले आहेत. शास्त्रीनग येथील रहिवासी व्यापारी कपिल आमेसर हे छाप्रूनगर येथील स्टेट बँकेत कामकाजानिमित्त गेले होते. ते शनिवारी दुपारी १२.३० वाजता मित्रासोबत बँकेच्या बाहेर पडले. त्यांनी मित्राला २५ हजार रुपये देऊन ८६ हजार ५०० रुपये पिशवीत ठेवले. पिशवी दुचाकीच्या डिक्कीत टाकून घरी पोहोचले. परंतू डिक्की उघडून पाहिल्यानंतर त्यात पैसे नव्हते. कपिलचे सीताबर्डीत मोबाईलचे दुकान आहे. सोमलवाडा येथील रहिवासी विजयकुमार माणिक शनिवारी सायंकाळी ७.२० वाजता सदरच्या सराफ चेंबरसमोर कारमध्ये बसले होते. एका युवकाने त्यांना कारच्या बाहेर पैसे पडल्याचे सांगितले. ते कारमधून उतरून खाली पाहत असताना त्या युवकाने कारमधील बॅग घेऊन पळ काढला. बॅगमध्ये कागदपत्र आणि १० हजार रुपये रोख होते. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.................केबलची चोरीनागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत एका खासगी कंपनीचे केबल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गुजरवाडीमध्ये केबल टाकण्यासाठी केबल ठेवले होते. १२ ते १५ जुलैच्या दरम्यान १ लाख १३ हजार रुपये किमतीचे केबल अज्ञात आरोपीने चोरून नेले. गणेशपेठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.