भाजप, कॉँग्रेस,राष्ट्रवादी व सेनेच्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: November 7, 2015 23:27 IST2015-11-07T23:27:31+5:302015-11-07T23:27:31+5:30
नियमबा आंदोलन : तीन आमदार, एक खासदार व नगरसेवकांचा समावेश

भाजप, कॉँग्रेस,राष्ट्रवादी व सेनेच्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल
न यमबा आंदोलन : तीन आमदार, एक खासदार व नगरसेवकांचा समावेशजळगाव: पूर्व परवानगी न घेता मोर्चा, उपोषण, धरणे व थाळीनाद आंदोलन तसेच परवानगी पेक्षा जास्त जणांनी जिल्हाधिकार्यांच्या दालनात प्रवेश करणार्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या ५७ जणांवर शनिवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात खासदार ईश्वरलाल जैन, आमदार डॉ.सतीश पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार गुरुमुख जगवाणी, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता, कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी यांच्यासह ५७ जणांचा समावेश आहे.दुखवटा साहित्य नेणे महागातअशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी यासाठी धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकार्यांच्या नावाच्या पाटीला दुखवटा साहित्य लावून त्यांच्या दालनात ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त जणांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याने दीपक गुप्ता, गजानन मालपुरे, मोहन तिवारी, शिवराम पाटील, राजेंद्र पाटील, परवेज पठाण, डॉ.राधेशाम चौधरी, कपील ठाकुर, महेश शिंपी, विजय राठोड, प्रताप पाटील, राहुल नेतलेकर, सागर कुटुंबळे, भगवान सोनार व सुनीता भालेराव यांच्यावर कॉन्स्टेबल उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.राष्ट्रवादीच्या तेरा जणांवर गुन्हेजमावबंदी आदेश लागू असताना तसेच कोणतीही परवानगी न घेता २९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील,खासदार ईश्वरलाल जैन, गफ्फार मलिक, विशाल देवकर, रवींद्र पाटील, परेश कोल्हे, मिनल पाटील, राजेश पाटील, मंगला पाटील, वाल्मिक पाटील, कल्पना पाटील, प्रतिभा शिरसाठ, दीपाली पाटील यांच्यासह अन्य ५० ते ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.