शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी, दहशतवादावर ऋषीमुनींचे वेदच एकमेव उपाय : सत्यपाल सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 10:12 IST

आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. 

नवी दिल्ली : देशातील गुन्हेगारी, दहशतवाद आणि जेवढ्या समस्या आहेत, त्यांच्या उच्चाटनासाठी काही उपाय असेल तर ऋषीमुनींचे वेद हाच आहे. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री आपल्या हातामध्ये वेद घेऊन शपथ घेतील, असे स्वप्न मला पडत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केले. महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. 

दिल्लीमध्ये आज आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला सुरुवात झाली. यावेळी प्रथम राष्टपती रामनाथ कोविंद यांनी संबोधित केले. हा थंडीचा काळ आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे श्वास गुदमरत आहे. सामाजिक संस्थांनी लोकांमध्ये सणांवेळी फटाके न जाळता शांततेत सण साजरा करण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले. 

यानंतर केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी भाषणावेळी वेदांची महती सांगताना केलेल्या विधानांमुळे वाद ओढवण्याची चिन्हे आहेत. देशात जेवढेकाही गुन्हे घडतात, दहशतवाद, समस्या आहेत, त्यांच्यावर एकमेव वेदच उपाय ठरणार आहेत. देशाला पुन्हा गौरवशाली व्हायचे असेल तर पुन्हा वेदच उपयोगी येतील असे सिंह यांनी सांगितले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतो तेव्हा तो बायबल या पवित्र ग्रंथ हातात घेतो. भारतातही राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री वेद हातात घेऊन शपथ घेतील, असे मी स्वप्न पाहत असल्याचे सिंह यांनी वक्तव्य केले. 

 

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगRamnath Kovindरामनाथ कोविंद