क्राईम सिंगल

By Admin | Updated: July 7, 2015 01:05 IST2015-07-07T01:05:55+5:302015-07-07T01:05:55+5:30

शेजाऱ्याने ॲक्टिव्हा जाळली

Crime Single | क्राईम सिंगल

क्राईम सिंगल

जाऱ्याने ॲक्टिव्हा जाळली
नागपूर : फलके लेआऊट फ्रेण्डस् कॉलनी येथील लक्ष्मीकांत मुकुंदा वरखडे (वय ३४) यांची ॲक्टिव्हा
आरोपी रवी राजू देशकर (वय २६) याने पेटवून दिली. वरखडे यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी रवी देशकरला अटक केली.
----
पळवून नेणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : वाडीतील अल्पवयीन मुलगी आणि प्रतापनगरातील तरुणीला (वय १९) पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. वाडीतील मुलगी १४ वर्षांची आहे. १ जुलैला दुपारी ४ वाजता ती घरून निघून गेली. तिला फूस लावून पळविल्याचा संशय आहे.
दुसरीकडे प्रतापनगरातील तरुणीला (वय १९) आरोपी शशांक ऋषीकुमार चंद्रकार (वय २४) याने २ जुलैला दुपारी ३.३० वाजता फूस लावून पळवून नेले. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----
वृद्धाने जाळून घेतले
नागपूर : गंगानगर, पुनापूर रोड येथे राहणारे रामदास हारोडे (वय ८२) यांनी शनिवारी रात्री ६.४५ वाजता स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. त्यांना मेयोत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी ५.२० ला डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
गळफास लावून आत्महत्या
नागपूर : नंदनवन हद्यीतील डे टु डे सुपर मार्केट जमुना कॉम्प्लेक्स येथे राहणारे कानाराम माणिकचंद बिसेन (वय ३५) यांनी सोमवारी पहाटे २.४५ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. भोलेश्वर नामदेव पारदी (वय २८) यांच्या सूचनेवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---

Web Title: Crime Single