क्राईम सिंगल

By Admin | Updated: January 29, 2015 23:16 IST2015-01-29T23:16:59+5:302015-01-29T23:16:59+5:30

बसमधून ४० हजार पळविले

Crime Single | क्राईम सिंगल

क्राईम सिंगल

मधून ४० हजार पळविले
नागपूर: स्टार बसमधून प्रवास करीत असताना एका प्रवाशाचे ४० हजार रुपये पळविण्यात आले. त्रिमूर्तीनगरमधील रहिवासी यशवंत पाटील (६७) बुधवारी दुपारी बर्डीवर येण्यासाठी स्टार बसमध्ये बसले. प्रवासा दरम्यान दोन संशयित महिलांनी त्यांच्या बॅगमधून ४० हजार रुपये पळविले. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
-०-०-०-०-०-
नंदनवनमध्ये घरफोडी
नागपूर: नंदनवन भागातील बंद असलेल्या घरातून चोरट्यांनी ६३ हजार रुपयांचा ऐवज पळविला. मंगळवारी रात्री ही घटना घडली.
आनंद कटारिया हे सहकुटुंब लग्न समारंभासाठी राजस्थानमध्ये गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला व कपाटातील १० हजार रोख आणि सोन्याचे दागिने असा ६३ हजाराचा ऐवज पळविला. कटारिया यांचे बंधू दिनेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(प्रतिनिधी)
-०-०-
वृद्धेच्या गळ्यातील
एकदाणी पळविली
नागपूर: रस्ता विसरलेल्या एका वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची एकदाणी पळविल्या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
फिर्यादी अंजनाबाई धोटे (७१) रा. कवडसी (ता. चिमूर) या त्यांची नातीच्या भेटीसाठी नागपूरला आल्या होत्या. रस्ता विसरल्याने त्या साकेतनगर बस स्टॉप, बेलतरोडी येथून पायी जात असताना आरोपींनी त्यांना गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याची एकदाणी (किंमत ६ हजार) पळविली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी श्रद्धा खंडागळे (२३) रा. साकेतनगरी, मनीषा अनिल खोब्रागडे (३२), अनिल खोब्रागडे (४०) रा. रामेश्वरी यांना अटक केली आहे.(प्रतिनिधी)
-०-०-०-०-
मुले पळाली
नागपूर: जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंगुलीमाल नगर येथील शासकीय वसतिगृहातील दोन मुले पळून गेल्याची तक्रार वसतिगृहाच्या अधीक्षकांनी जरीपटका पोलीस ठाण्याकडे केली आहे.(प्रतिनिधी)
-०-०-०-०-
झाडावरून पडल्याने मृत्यू
नागपूर: चार दिवसापूर्वी झाडावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेला दिनेश गेडाम (२७) रा. अजनी याचा उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू झाला. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crime Single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.