शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वृद्ध आई-वडिलांना केली मारहाण, तलवार दाखवत म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:36 IST

Crime News: आई-वडील आणि मुलग्याच्या नात्याला कलंक लावणारी अत्यंत धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबाद येथून समोर आली आहे. येथे एका मुलाने वृद्ध आई-वडीलांनी घर खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांना बेदम मारहाण केली.

आई-वडील आणि मुलग्याच्या नात्याला कलंक लावणारी अत्यंत धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबाद येथून समोर आली आहे. येथे एका मुलाने वृद्ध आई-वडीलांनी घर खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांना बेदम मारहाण केली.  एवढंच नाही तर घरातील तलवार दाखवत हातपाय तोडण्याची धमकी दिली. दरम्यान, वडिलांनी वेजलपुर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना अहमदाबादमधील जुहापुरा येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या एका ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीने वेजलपूर पोलिस ठाण्यात आपल्या मुलाविरोधात तक्रार दिली आहे.  या तक्रारीनुसार पीडित वृद्ध गृहस्थांचा ४० वर्षांचा मुलगा, त्याची पत्नी आणि तीन मुलांसह घरातील वरच्या मजल्यावर राहतो. तर सदर वृद्ध गृहस्थ घराबाहेर एक छोटंसं दुकान चालवून कुटुंबाचं पालन पोषण करतात.

दरम्यान, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या वृद्धाच्या मुलाने आईकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. तेव्हा आईने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. हे ऐकून आरोपी मुलाने आईसोबत भांडण करायला सुरुवात केली. तसेच शिविगाळ करून मारहाण केली. आईने आरडा ओरडा केल्यावर वृद्ध वडील तिथे आले, तेव्हा मुलाने त्यांच्याशीही भांडण्यास सुरुवात केली.

एवढंच नाही तर त्याने घरात ठेवलेली तलवार बाहेर आणली. तसेच तलवारीचा धाक दाखवून वृद्ध माता पित्याला धमकावण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर हात पाय तोडेन अशी धमकी त्याने आई-वडिलांना दिली. त्यानंतर आई वडिलांनी पोलीस कंट्रोलला फोन करून मदत मागितली. तेव्हा आरोपी घरातून फरार झाला. आका अहमदाबादमधील वेजलपूर पोलिसांनी आई वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार