शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 14:57 IST

तरुण कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर बेशुद्ध पडला आणि त्याला शुद्ध आली ती थेट रुग्णालयात, पाच दिवसांनंतर. शुद्धीवर आल्यावर त्याला समजले की...

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका विवाहित पुरुषाने आपल्यावर जबरदस्तीने लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया (sex change operation) केल्याचा आरोप केला आहे. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्याला कोल्डड्रिंक देऊन बेशुद्ध केले गेले आणि त्यानंतर त्याचे गुप्तांग कापण्यात आले.

पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, तो एका नृत्य कार्यक्रमासाठी बदाऊनला जात असताना, त्याला लविना किन्नर आणि तिचा मित्र विकास भेटले. लविनाने त्याला आपल्या घरी नेले, जिथे त्याला कोल्ड्रिंक देण्यात आले. ते कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि त्याला शुद्ध आली ती थेट रुग्णालयात, पाच दिवसांनंतर. शुद्धीवर आल्यावर त्याला समजले की, त्याचे लिंग कापले गेले आहे आणि त्याचे लिंग परिवर्तन झाले आहे. सध्या तो रुग्णालयात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पत्नीने केला धक्कादायक खुलासा!पीडितेच्या पत्नीने या प्रकरणी आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पत्नीने सांगितले की, तिचा नवरा एक विनोदी कलाकार आणि नर्तक आहे आणि तो लविनासोबत पार्ट्यांमध्ये काम करतो. लविना आणि विकास यांनी तिच्या पतीला आमिष दाखवून लविनाच्या घरी नेले. तिथे लविनाने तिच्या पतीच्या पेयात मादक पदार्थ मिसळले. बेशुद्ध अवस्थेत, लविना आणि विकास यांनी तिच्या पतीची जबरदस्तीने लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली.

डॉक्टरांनी काय सांगितले?पत्नीने पुढे सांगितले की, पाच दिवसांनी तिच्या पतीला शुद्ध आल्यावर त्याने फोन करून तिला या घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी या प्रकरणाची पुष्टी केली असून, काही वैद्यकीय अहवाल मागवले आहेत. डॉ. आर.के. चंदेल यांनी सांगितले की, लिंग बदलाचे प्रकरण समोर आले आहे आणि काही अल्ट्रासाऊंडसह इतर अहवाल मागवण्यात आले आहेत.

पोलिसांची कारवाईपोलिसांनी सांगितले की, पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लविना किन्नर आणि विकास यांना ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे. तपासानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश