शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! खोकल्यावर दुकानदाराने कोरोना आहे का? विचारलं; संतापलेल्या 'त्याने' डोकंच फोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 16:20 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 356 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खोकल्यावर दुकानदाराने कोरोना आहे का? असं विचारलं म्हणून संतापलेल्या एका व्यक्तीने त्याचं डोकंच फोडल्याची घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. दुकानात आलेल्या एका ग्राहकाला खोकला आला. त्यावर दुकानदाराने त्याला कोरोना आहे का? असा प्रश्न विचारला. यानंतर रागावलेल्या व्यक्तीने थेट दुकानदाराचं डोकं फोडल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आणि कुटुंबीयांनी दुकानदाराला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. 

लोखंडी रॉडने केली मारहाण

विपिन असं दुकानदाराचं नाव आहे. तर दोन जणांनी त्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. आरोपींमध्ये वसीम अहमद आणि अबरार या दोघांचा समावेश आहे. विपिन याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचे काका प्रमोद यांचं बाजारात एक कपड्याचं दुकान आहे. तो आपल्या काकांच्या दुकानात काम करतो. त्याच दरम्यान आरोपी दुकानात आला आणि खोकू लागला. तेव्हा विपिनने त्याला कोरोना आहे का? असं विचारलं. त्यानंतर तो संतापला आणि त्याने वाद घालायला सुरुवात केली. तसेच रॉडने मारहाण केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी