शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Crime: माय-लेकामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीचे डोके फिरले, अन् भयानक हत्याकांड घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 22:04 IST

Crime: आरोपी पती बऱ्याच दिवसांपासून स्वत:ची पत्नी आणि मुलामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता

पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात नात्यांना कलंक लावणारी एक घटना घडली आहे. येथे एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. ही हत्या तिच्या पतीनेच केल्याचा आरोप होत आहे. हत्येच्या घटनेनंतर तो फरार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हैवानाला त्याची पत्नी आणि मुलग्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या प्रकरणी आरोपीच्या मुलीने त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे. 

बंगालमधील कालना तालपुकूर येथे मदन बाग हा इसम त्याची पत्नी ठाकुरानी बाग, दोन मुली आणि एका मुलासह राहतो. या महिलेच्या भावाने सांगितले की, मदन बऱ्याच दिवसांपासून स्वत:ची पत्नी आणि मुलामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्यामुळे हा मुलगा मामाकडे राहतो. तो मालदा येथील एका हॉटेलमध्ये काम करतो. तसेच नुकताच तो घरी आला होता.

मयत महिलेच्या भावाने पुढे सांगितले की, माझ्या बहिणीने तिच्या मुलाला पाहणयाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरूनच तिचं आणि तिच्या पतीचं भांडण झालं. त्यानंतर डोक्यात संशयाचा सैतान शिरलेल्या पतीने पत्नीची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या केली आणि फरार झाला. त्यानंतर सकाळी दोन्ही मुलींना आई खोलीतून बाहेर आलेली दिसली नाही. त्यामुळे छोटी मुलगी धावत तिच्याजवळ आली. तिने अंथरुणावर आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले.

त्यानंतर नातेवाईक आणि शेजारच्या लोकांना माहिती देण्यात आली. या घटनेमुले परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. या प्रकरणी महिलेच्या धाकट्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारwest bengalपश्चिम बंगाल