पंजाबमधील लुधियाना येथे एका बँक मॅनेजरचा गळफासाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. या बँक मॅनेजरचे हात मागच्या बाजूने बांधलेले होते. तसेच त्याच्या शरीरावर लेडिज अंडरगार्मेंट परिधान केलेल्या होत्या. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी घातपाताच्यी शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली आहे. त्याबरोबरच आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून त्यातून पुरावे शोधले जात आहेत.
ही घटना अमरनगर परिसरात घडली. लुधियाना पोलिसांनी सांगितले की, सिनियर बँक मॅनेजर गेल्या दीड वर्षांपासून एकटा राहत होता. सकाळी जेव्हा तो आपल्या खोलीतून बाहेर आला नाही तेव्हा त्याच्या घरमालकाने अनेकदा घराचा दरवाजा ठोठावला. मात्र तरीही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घरमालकाने त्या भागातील नगरसेवक गुरदीप सिंग निटू आणि इतर लोकांना माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले. डिव्हिजन नंबर २ पोलीस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर अमृतपाल सिंह यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या उपस्थितीत पोलिसांना दरवाजा तोडला. तेव्हा बँक मॅनेजर विनोद मसीह यांचा मृतदेह छतावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्याचे हात मागे बांधलेले होते. शरीरावर लेडिज अंडरगार्मेंट होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने फॉरेंसिक टिमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपूर्वीच विनोदचा जन्मदिवस होता.
विनोद मसीह येथे कॅनरा बँकेच्या स्थानिक शाखेमध्ये सिनियर मॅनेजर पदावर तैनात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसीह याची पत्नी आणि मुलगा फिरोजपूरच्या टंकनवाली बस्ती परिसरात राहतात. शेजाऱ्यांनी सांगितले की, विनोदचे नातेवाईक या भागात कधीच दिसले नाहीत. खोलीतून कुठलीही सुसाईड नोटही सापडलेली नाही.
शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी शुक्रवारी रात्री मसीहला शेवटचे पाहिले होते. तो बँकेतून ड्युटी आटोपून परतला होता. तसेच आपल्या खोलीत जात होता. त्यानंतर त्याने आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला. आता पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे. तसेच आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून धागेदोरे शोधले जात आहेत.