शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

Crime: शरीरावर लेडिज अंडरगार्मेंट, बांधलेले हात, बँक मॅनेजरचा सापडला संशयास्पद मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 14:42 IST

Crime-News: पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली आहे. त्याबरोबरच आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून त्यातून पुरावे शोधले जात आहेत.

पंजाबमधील लुधियाना येथे एका बँक मॅनेजरचा गळफासाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. या बँक मॅनेजरचे हात मागच्या बाजूने बांधलेले होते. तसेच त्याच्या शरीरावर लेडिज अंडरगार्मेंट परिधान केलेल्या होत्या. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी घातपाताच्यी शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली आहे. त्याबरोबरच आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून त्यातून पुरावे शोधले जात आहेत.

ही घटना अमरनगर परिसरात घडली. लुधियाना पोलिसांनी सांगितले की, सिनियर बँक मॅनेजर गेल्या दीड वर्षांपासून एकटा राहत होता. सकाळी जेव्हा तो आपल्या खोलीतून बाहेर आला नाही तेव्हा त्याच्या घरमालकाने अनेकदा घराचा दरवाजा ठोठावला. मात्र तरीही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घरमालकाने त्या भागातील नगरसेवक गुरदीप सिंग निटू आणि इतर लोकांना माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले. डिव्हिजन नंबर २ पोलीस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर अमृतपाल सिंह यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या उपस्थितीत पोलिसांना दरवाजा तोडला. तेव्हा बँक मॅनेजर विनोद मसीह यांचा मृतदेह छतावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्याचे हात मागे बांधलेले होते. शरीरावर लेडिज अंडरगार्मेंट होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने फॉरेंसिक टिमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपूर्वीच विनोदचा जन्मदिवस होता.

विनोद मसीह येथे कॅनरा बँकेच्या स्थानिक शाखेमध्ये सिनियर मॅनेजर पदावर तैनात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसीह याची पत्नी आणि मुलगा फिरोजपूरच्या टंकनवाली बस्ती परिसरात राहतात. शेजाऱ्यांनी सांगितले की, विनोदचे नातेवाईक या भागात कधीच दिसले नाहीत. खोलीतून कुठलीही सुसाईड नोटही सापडलेली नाही.

शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी शुक्रवारी रात्री मसीहला शेवटचे पाहिले होते. तो बँकेतून ड्युटी आटोपून परतला होता. तसेच आपल्या खोलीत जात होता. त्यानंतर त्याने आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला. आता पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे. तसेच आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून धागेदोरे शोधले जात आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाबPoliceपोलिस