क्राईम ((((((शंका -- नाव)))))
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
कुंडईत एकाचा मृत्यू
क्राईम ((((((शंका -- नाव)))))
कुंडईत एकाचा मृत्यूफोंडा : कुंडई-मडकई बगल रस्त्यावर रानडुकराला दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला़ ही घटना बुधवार, दि़ २५ रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, हा अपघात मध्यरात्री घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़(((((चंद्राकर )))) जगन्नाथ सोनटक्के (३३, रा. खोर्ली-तिसवाडी, मूळ महाराष्ट्र) हे आपल्या जीए-०३-एल-९४९६ क्रमांकाच्या दुचाकीसह रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आले़ तसेच त्याच्यापासून अवघ्या काही अंतरावर रानडुकरही मरून पडले होते. रात्री दुचाकीची जोरदार धडक या रानडुकराला बसली असावी व त्यातच सोनटक्के यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक रामचंद्र नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला़ त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवून देण्यात आला़ फोंडा पोलीस पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)