शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Crime: कॉलगर्लचं आमिष दाखवून फसवणूक, व्हॉट्सअॅपवर हॉट तरुणींचे फोटो पाठवायचे आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 22:41 IST

Crime: पोलिसांनी मोठी कारवाई करत एका टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी कॉलगर्लचा पुरवठा करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

राजस्थानमधील उदयपूर येथील प्रतापनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी कॉलगर्लचा पुरवठा करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी कॉलगर्लच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळत असत. त्यासाठी आरोपींनी एक अॅप तयार केले होते. या अॅपच्या माध्यमातून आरोपी लोकांशी संपर्क साधत असत. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर  कॉलगर्लचे फोटो पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असत. त्यानंतर संबंधित ग्राहकांना कारमध्ये बसवून बदमान करण्याची धमती देत. त्यानंतर त्यांना तलवारीचा धाक दाखवून पैसे उकळायचे.

याबाबत पोलीस अधिकारी हिमांशू सिंह राजावत यांनी सांगितले की, खबऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळाल्यानंतर या गँगचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम बनण्यात आली. या टीममधील सदस्याला बनावट ग्राहक बनवून त्याच्या मोबाईलमधून संबंधिक अॅप चालवण्यात आले. अॅपवर मिळालेल्या नंबरवर संपर्क केला गेला. समोरच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅप कॉलवर बोलण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी मुलींचे फोटो पाठवले. त्यानंतर बोगस ग्राहक बनलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने यातील एका मुलीचा फोटो निवडला आणि आरोपींना पाठवला.

त्यानंतर आरोपींनी त्याला भेटण्यासाठई सुखानाका रोडवर बोलवले. त्यावर पोलिसांच्या टीमने योजनाबद्ध पद्धतीने घटनास्थळावर सापळा रचला. तिथे एक जीप आणि कार उभी होती. बनावट ग्राहक बनलेला पोलीस कर्मचारी जीपजवळ पोहोचला, तेव्हा त्यातील एक आरोपी पुडे आला. त्याने त्या बनावट ग्राहकाला कारमध्ये बसवले. त्यानंतर दोन्ही वाहने तिथून निघून जात होती. त्यावेळी पोलिसांनी या दोन्ही वाहनांना अडवले आणि त्यांचा शोध घेतला.

या वाहनांमधून एक तलवार, १० मोबाईल, दोन हजार रुपये आणि दोन डायऱ्या सापडल्या. चौकशीमधून आरोपींची नावं प्रीतम सिंह राजावत, मनीष चौधरी, अशोक सैन, सुबराती खान आणि दीपक कुमार मीणा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पाचही आरोपांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान