शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित प्रेयसीच्या घरी पोहोचला प्रियकर, तिला पळवले, मग नवऱ्याला केला फोन, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 20:54 IST

Crime: बिहारमध्ये एखा व्यक्तीने तिच्या विवाहित प्रेयसीला घरातून पळवल्यानंतक तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना समस्तीपूर जिल्ह्यात घडली आहे.

बिहारमध्ये एखा व्यक्तीने तिच्या विवाहित प्रेयसीला घरातून पळवल्यानंतक तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना समस्तीपूर जिल्ह्यात घडली आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील दलसिंहसरायमधील चांदचौर गावात हा धक्कादायक प्रकार घडला. एक-दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी गर्दी जमली.

सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यानंतर उजियारपूर ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू करत मृतदेहाचे फोटो आजूबाजूच्या परिसरात पाठवले. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. मृत महिला ही बेलामेघ गावातील रहिवासी असलेले अजय पासवान यांची पत्नी उजाला असल्याचे निष्पन्न झाले.

मृत महिलेचा पती अजय पासवान याने सांगितले की, तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. दरम्यान, गावातीलच नितीश कुमार याच्याशी तिचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. गेल्या सोमवारी नितीश तिला घरातून पळवून घेऊन गेला होता. ही बाबत या महिलेच्या पतीला समजल्यावर तो नितीशच्या घरी गेला. त्याने पत्नीला परत करण्यासाठी विनंती केली. मात्र नितीशने त्याचं ऐकलं नाही. तसेच त्याला धमकी दिली. त्यानंतर या महिलेचा पती अजय हा परत फिरला. त्यानंतर नितीशने आपल्या मोबाईलवरून त्याचं आणि त्याच्या पत्नीचं बोलणं करवलं. तसेच त्याला दलसिंहसराय येथे येण्यास सांगितले. रात्री ९ च्या सुमारास बोलणं झालं आणि सकाळी उजाला हिचा मृतदेह सापडला.

या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण नितीश कुमार हा उजालावर प्रेम करत होता. तसेच तिचं लग्न झाल्यानंतरही तिला घरातून पळवून घेऊन गेला होता. त्यामुळे एक प्रियकर खुनी कसा बनला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार