शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Crime: भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यूप्रकरण: आणखी एका ड्रग पेडलरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 07:01 IST

BJP leader Sonali Phogat death case: भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित खूनप्रकरणी गोवा पोलिसांनी आणखी एका ड्रग पेडलरला (अमली पदार्थांची विक्री करणारा) अटक केली. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.

पणजी : भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित खूनप्रकरणी गोवा पोलिसांनी आणखी एका ड्रग पेडलरला (अमली पदार्थांची विक्री करणारा) अटक केली. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.  

माजी टिकटॉक स्टार, तसेच बिग बॉस या रिॲलिटी टीव्ही शोच्या स्पर्धक फोगाट यांचा २३ ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. त्यांना त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी बळजबरीने अमली पदार्थ दिल्याचा आरोप आहे. अंजुना पोलिसांनी काल रात्री ड्रग पेडलर रामा ऊर्फ रामदास मांद्रेकर याच्या मुसक्या आवळल्या. 

रामाने दुसरा एक ड्रग पेडलर दत्तप्रसाद गावकर याला अमली पदार्थ पुरवले होते. नंतर गावकरने त्याची या प्रकरणातील अन्य दोन आरोपी सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांना कथितरीत्या विक्री केली होती. सांगवान व सिंग यांनी फोगाट यांना हा अमली पदार्थ दिला होता. त्यानंतर फोगाट यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले होते. सांगवान आणि सिंग हे फोगाट यांच्यासोबत गोव्याला आले होते.  फोगाट यांना देऊन उरलेला अमली पदार्थ पोलिसांनी नंतर रेस्टाॅरंटच्या वॉशरूममधून जप्त केला होता. सांगवान व सिंग यांनी फोगाट यांना मेथामफेटामाइन हा अमली पदार्थ दिल्याचे तपासात समोर आले आहे. 

तिघांना पाच दिवसांची कोठडीसोनाली फोगाटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन जणांना न्यायालयाने रविवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गोव्यातील कर्लिस रेस्टॉरंटचा मालका एडविन न्युन्स याच्यासह ड्रग पेडरल दत्तप्रसाद गावकर व रमाकांत मांद्रेकर यांना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यांना पाच दिवस कोठडीत ठेवण्यात आदेश दिले. न्युन्स याने जामिनासाठी अर्ज सादर केला होता. तथापि, न्यायालयाने तो फेटाळला.

हरयाणा सरकारकडून सीबीआय चौकशीचा आग्रहचंडीगड : हरयाणा सरकार सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी गोवा सरकारला पत्र पाठवणार आहे. सोनाली यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची चंडीगड येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी करणारे निवेदन दिले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार गोवा सरकारला याबाबत पत्र पाठवून आग्रह धरेल, अशी ग्वाही त्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत सोनाली यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. या संकटाच्या काळात सरकार सोनाली यांच्या कुटुंबासोबत आहे, असे ते म्हणाले. सोनाली यांची मुलगी यशोधरा हिच्याशिवाय त्यांची बहीण आणि भाऊ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

टॅग्स :Sonali Phogatसोनाली फोगाटCrime Newsगुन्हेगारीgoaगोवा