मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार्या महिलेवर गुन्हा
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:37+5:302015-09-07T23:27:37+5:30
सोलापूर : सोलापूर दौर्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून आपली गार्हाणी मांडणार्या महिलेवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भारती सायबण्णा कोळी (४१) तिचे नाव आहे.

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार्या महिलेवर गुन्हा
स लापूर : सोलापूर दौर्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून आपली गार्हाणी मांडणार्या महिलेवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भारती सायबण्णा कोळी (४१) तिचे नाव आहे.मोहोळ आणि अक्कलकोट येथील तलावांची पाहणी करून रविवारी मुख्यमंत्री विमानतळावर आले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी मोटारीने जात असताना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर त्यांच्या ताफ्यासमोर भारती कोळी मधे आल्या. पोलीस शिपाई अनिला बाबू राठोड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)