विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:29+5:302015-02-18T00:13:29+5:30
विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
व नापरवाना रेती वाहतूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हानागपूर : रेतीची चोरी करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध पाचपावली पोलिसांनी सोमवारी रात्री १.५५ वाजता गुन्हा दाखल केला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र जांभूळकर (२६) हे सहकाऱ्यांसोबत गस्त घालत होते. दरम्यान रात्री १.५५ वाजता दहाचाकी टिप्पर क्रमांक एम.एच. ४०, वाय-८८८४ चा चालक खुशाल त्रिशाम दुबे रा. कोंडा, ता. भद्रावती जि. चंद्रपूर हा आपल्या ट्रकमध्ये परवाना नसताना रेती भरून त्याची वाहतूक करताना आढळला. पाचपावली पोलिसांनी रेती आणि ट्रक असा एकूण २.३२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.