शिवरायांच्या अवमानप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा
By Admin | Updated: March 23, 2017 17:18 IST2017-03-23T17:18:42+5:302017-03-23T17:18:42+5:30
शिवरायांच्या अवमानप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

शिवरायांच्या अवमानप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा
श वरायांच्या अवमानप्रकरणी तिघांविरोधात गुन्हावसई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस चौकशी सुरु असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अमित मिश्रा, संदीप सिंग आणि राकेश सिंग अशी त्यांची नावे आहेत. महाराजांच्या वेशभुषेत एका नेत्याचे चित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांी ही कारवाई केली असून अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी )