शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 07:30 IST

कंपनीची सायबर पोलिसांकडे तक्रार

तिरूपती/अहमदाबाद : आंध्र प्रदेशातील तिरूपती येथील श्री वेंकटेश्वर स्वामी  मंदिरातील लाडूसाठी वापरलेले भेसळयुक्त तूप ‘अमूल’ ब्रँडचे होते, अशी अफवा पसरवणाऱ्या सात ‘एक्स’ वापरकर्त्यांविरुद्ध शनिवारी अहमदाबादेत गुन्हा दाखल केला.  

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी भगवान बालाजीच्या लाडूच्या वादाला तोंड फोडले आहे. आधीच्या सरकारच्या काळात लाडूसाठी जनावरांची चरबी असलेले तूप वापरण्यात येत होते, असा आरोप नायडू यांनी प्रयोगशाळांतील अहवालांच्या हवाल्याने केला आहे. त्यातच ‘लाडूंसाठी वापरण्यात आलेले हे बनावट तूप गुजरातच्या आणंद येथील ‘गुजरात सहकारी दूध विपणन महासंघा’च्या अमूल ब्रँडचे होते,’ अशा आशयाच्या पोस्ट ‘एक्स’वर व्हायरल झाल्या. यांतील सातजणांविरोधात ‘जीसीएमएमएफ’च्या तक्रारीनंतर अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने एफआयआर नोंदवला आहे.  

‘तिरूपतीच्या लाडूला पुन्हा पावित्र्य बहाल’

दरम्यान, तिरूपतीच्या प्रसिद्ध ‘लाडू प्रसादम्’ला पुन्हा पावित्र्य बहाल करण्यात आले आहे, असे तिरूमला तिरूपती देवस्थानमने (टीटीडी) म्हटले आहे. 

टीटीडीने एका समाजमाध्यम पोस्टमध्ये म्हटले की, ‘श्रीवारी लाडूची दिव्यता आणि पावित्र्य आता निर्विवाद आहे. सर्व भक्तांच्या समाधानासाठी लाडू प्रसादम्चे पावित्र्य कायम राखण्यासाठी देवस्थान  वचनबद्ध आहे.’

भाजपची जगन यांच्यावर टीका

अमरावती : भाजपाचे आंध्र प्रदेशातील नेते एल. दिनाकर यांनी युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीचे (वायएसआरसीपी) अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

दिनाकर यांनी म्हटले की, रेड्डी यांना सरकारी खजिना लुटणे आणि हिंदू रीतिरिवाज व परंपरा यांना कलंकित करणे यांशिवाय दुसरे कोणतेही ज्ञान नाही. एकूणच या प्रकरणावरून सुरु झालेले वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशPoliceपोलिस