गोव्याच्या माजी मंत्र्याविरोधात गुन्हा

By Admin | Updated: September 16, 2014 02:27 IST2014-09-16T02:27:33+5:302014-09-16T02:27:33+5:30

खाण घोटाळा प्रकरणात माजी मंत्री ज्योकिम आलेमाव, खाणमालक माजी आमदार अनिल साळगावकर यांच्याविरुद्ध विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुन्हे नोंदविले आहेत.

Crime against former minister of Goa | गोव्याच्या माजी मंत्र्याविरोधात गुन्हा

गोव्याच्या माजी मंत्र्याविरोधात गुन्हा

पणजी : खाण घोटाळा प्रकरणात माजी मंत्री ज्योकिम आलेमाव, खाणमालक माजी आमदार अनिल साळगावकर यांच्याविरुद्ध विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुन्हे नोंदविले आहेत. संशयितांनी कुर्डेल आणि कुर्पे येथील डोंगर कापून बेकायदेशीरपणो पाच वर्षे लूट केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. 
खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार अलेमाव आणि कांतिलाल कंपनीचे संचालक अनिल साळगावकर यांनी 2क्क्6 ते 2क्11 या काळात कुर्डे आणि कुर्पे गावाचा अश्नी डोंगर कापून खनिज उत्खनन सुरू केल्याचे म्हटले आहे. दोन्हींकडे वैध खाण लीजही नव्हते आणि वनक्षेत्रत खाण खोदताना वनखात्याची परवानगीही घेण्यात आली नव्हती, असे खाण खात्याच्या तपासात उघडकीस आले आहे. 5 वर्षे बेकायदेशीरपणो सुरू असलेल्या या उत्खननामुळे सरकारी तिजोरीला फटका बसल्याचे तक्रारीत म्हटलेय.
मागील विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी खाण प्रकरणात अडकलेल्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यात ज्योकी आलेमाव यांचा उल्लेख केला होता. शहा आयोगाच्या तिस:या अहवालात खाण कंपन्यांनी 2,747 कोटींची लूट केल्याचे म्हटले होते. संबंधित रक्कम 6 महिन्यांत वसूल करू असे आश्वासन र्पीकर यांनी दिले होते. (प्रतिनिधी) 

 

Web Title: Crime against former minister of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.