जमीन घोटाळ्यात उपनिबंधकावर गुन्हा

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30

मखमलाबाद प्रकरण : भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत निर्णय

Crime against the accused in the land scam | जमीन घोटाळ्यात उपनिबंधकावर गुन्हा

जमीन घोटाळ्यात उपनिबंधकावर गुन्हा

मलाबाद प्रकरण : भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत निर्णय
नाशिक : मखमलाबाद येथील वतनाच्या जमिनीचा कुठलाही नजराणा न भरता, बिनशेती न करताच साडेसहा एकर (दोन हेक्टर ५८ आर क्षेत्र) ऐवढ्या जमिनीची खरेदी-विक्र ी केली. ती दुय्यम उपनिबंधकांनी कशी केली? असा सवाल भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. तसेच सह दुय्यमनिबंधकांनी संबंधित उपनिबंधकासह यातील दोषींवर गुन्हा दाखल करावा, असा निर्र्णय समितीने घेतला.
मखमलाबाद येथील पटेल यांच्या वतनाच्या जमिनीवर गोकुळ मटाले या विकासकाने गजवक्र सोसायटीत घरकुलांची योजना राबविली आहे. त्यातील काही सदनिकांची परस्पर विक्र ीही केली आहे; परंतु गजवक्र सोसायटीतील सदनिकांची खरेदी केलेल्या नागरिकांचे अद्यापही सात-बारा उतार्‍यावर नाव लागले नसल्याची तक्र ार भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत केली; परंतु नाव लागण्यासाठी त्या जमिनीचा संपूर्ण व्यवहार नियमाने होणे आवश्यक असल्याचे मत निवासी उप जिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी मांडत, वतनाची जमीन असल्याने खरेदी अथवा विक्र ी करावयाची असल्यास त्यात शासनाला नजराणा भरावा लागत असल्याचे सांगितले. शिवाय त्यावर कुठलेही बांधकाम करावयाचे झाल्यास शेत जमिनीच्या बिनशेतीची परवानगी घ्यावी लागते. त्याचबरोबर नागरी जमीन कमाल धारणा कायद्यांतर्गत या जमिनीचा कर भरण्यासाठी मुदतही वाढवून घेणे गरजेचे असते; परंतु यापैकी कुठलीही बाब पूर्ण झाली नसल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे काकुस्ते यांनी सांगितले. त्यामुळे प्रथम ही खरेदी-विक्र ी बिना नजराणा भरता कशी केली, याची तपासणी करण्यासह सहनिबंधकांनी संबंधित दुय्यम निबंधकांवर कारवाई करावी, तसेच याचा खोटा बिनशेती पुरावा सादर केला असल्यास किंवा बिनशेती दाखला सादर न करता व्यवहार झाला कसा यासंदर्भात तपासणी करावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
---
इन्फो
संजय गांधी निराधार
योजनेत भ्रष्टाचार
बैठकीत पेठ तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेत ५० लाख ते १ कोटी रु पये भ्रष्टाचार झाल्याचीही तक्र ार करण्यात आली. त्यावर पेठच्या तहसीलदारांनी ९१ हजार चारशे रु पये वसूल झाले असून, तेवढ्याच रकमेचा हिशोब लागत नसल्याचा खुलासा केला. मात्र, त्याच्या सखोल चौकशीचे आदेश काकुस्ते यांनी दिले.

Web Title: Crime against the accused in the land scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.