शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Crime: एका आईचा सूड! मुलाच्या खुन्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घरी बोलावलं, त्यानंतर…  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:46 IST

Crime News: . एका आईने घेतलेल्या खुनी बदल्याची ही गोष्ट. मुलाच्या दफनविधीवेळीच आईने तिच्या मुलाच्या खुन्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली. त्यानंतर तिने तिच्या मुलांच्या खुन्यांचा असा काही बदला घेतला की, ज्याबाबत वाचल्यावर कुणीही कुठल्या आईपासून तिच्या मुलांना हिरावून घेण्याचा विचारही करणार नाही.

प्रत्येक गुन्ह्यामागे कुठलं ना कुठलं कारण असतं. अशीच एक धक्कादायक क्राईम स्टोरी आंध्र प्रदेशमधून समोर आली आहे. एका आईने घेतलेल्या खुनी बदल्याची ही गोष्ट. मुलाच्या दफनविधीवेळीच आईने तिच्या मुलाच्या खुन्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली. त्यानंतर तिने तिच्या मुलांच्या खुन्यांचा असा काही बदला घेतला की, ज्याबाबत वाचल्यावर कुणीही कुठल्या आईपासून तिच्या मुलांना हिरावून घेण्याचा विचारही करणार नाही.

ही गोष्ट आहे आंध्र प्रदेशमधील रहिवासी असलेल्या जान बी या महिलेची. जान बी हिच्या पतीचा १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ती तिच्या दोन मुलांसह आंध्र प्रदेशमधील पंडालू जिल्ह्यात राहाते. तिचा मोठा मुलगा १७ वर्षांचा तर लहान मुलगा १६ वर्षाचा होता. दोन वर्षांपूर्वी तिची ओळख बाजी नावाच्या इसमाशी झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र जान बीच्या मोठ्या मुलाला ही गोष्ट आवडत नव्हती. त्याने आपल्या आईला भेटू नकोस म्हणून बाजीला बजावले. त्यामुळे नाराज झालेल्या बाजीने ऑगस्ट २०२१ मध्ये अल्ला कसम नावाच्या मित्रासोबत मिळून जान बी हिच्या  मोठ्या मुलाची हत्या केली.

मुलाच्या हत्येमुळे जान बी. संतप्त झाली. तिने मुलाची हत्या करणाऱ्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली. मुलाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यात म्हणजे सुमारे दीड वर्षांपूर्वी तिने मुलाचा खुनी अल्ला कसम याची तिने हत्या केली. त्यानंतर तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर ती जामिनावर बाहेर आली. 

मुलाच्या हत्येतील एका आरोपीला ठार मारल्यानंतर तिने दुसऱ्या आरोपीचा बदला घेण्यासाठी योजना आखली. सुडाने पेटलेली जान बी आपली हत्या करू शकते याची जाणीव या दुसरा आरोपी असलेल्या बाजी याला होती. तो बरेच दिवस भूमिगत राहिला. अचानक एके दिवशी जान बी हिने त्याला फोन केला. तसेच ती पुन्हा त्याच्या प्रेमात पडल्याचे सांगितले. मी तुझ्यासोबत राहू इच्छिते असेही तिने सांगितले. त्यानंतर काही दिवस तिने बाजीसोबत प्रेमाचं नाटक केलं.

मंगळवारी भावाच्या वाढदिवसादिवशी जान बी हिने बाजी याला घरी बोलावले. त्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये तिने बाजीला खूप दारू पाजली. त्यानंतर भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने तिने बाजीचा खून केला. त्यानंतर बाजीच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच अर्धा जळालेला मृतदेह तिने खड्डा खोदून पुरून टाकला. मुलाच्या दोन्ही खुन्यांना तिने ठार मानले. त्यानंतर तिने पुन्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAndhra Pradeshआंध्र प्रदेश