क्राईम

By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:09+5:302015-07-03T23:00:09+5:30

उत्तोर्डा येथे चोरट्यास अटक

Crime | क्राईम

क्राईम

्तोर्डा येथे चोरट्यास अटक
वास्को : उत्तोर्डा येथील एका घरात शिरून कपाटातील साहित्याची चोरी करताना घरातील माणसांनी एका चोरट्यास पकडून वेर्णा पोलिसांच्या स्वाधीन केले़ चोरीची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली़
उत्तोर्डा-लोयला वाडो येथील जोनिका जासिंत क्रुझ यांच्या घराच्या मुख्य दारातून बेर्नाड किरकि˜े (१९, मूळ कोलकाता) या अल्पवयीन मुलाने प्रवेश केला़ काही वेळाने त्याने एका बेडरूममध्ये जाऊन तेथील कपाट उघडून त्यातील काही साहित्य लंपास करण्याच्या तयारीत असताना जोनिका यांच्या नजरेस हा प्रकार आला़ त्यांनी तात्काळ त्या चोरट्याला खोलीत बंद करून ठेवले़ त्यानंतर तिने शेजार्‍यांच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली़
वेर्णा पोलिसांनी चोरट्यावर भा़दं़सं़ च्या ४५४, ३८० आणि ५११ कलमाखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे़ शुक्रवारी त्याला येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करून अधिक चौकशीसाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करून घेण्यात आली आहे़ उपनिरीक्षक रोहन मडगावकर पुढील चौकशी करत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.