क्राईम
By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:09+5:302015-07-03T23:00:09+5:30
केपे अपघातात एक ठार

क्राईम
क पे अपघातात एक ठारकेपे : शिरवई-केपे येथील सोमेश्वर मंदिराजवळ झालेल्या मोटरसायकल अपघातात डॉमनिक ओलिव्हेरा (४७, रा़ बब्रुमड्डी-केपे) यांचा मृत्यू झाला़ शुक्रवार, दि़ ३ रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास ही घटना घडली़ डॉमनिक हे आपल्या दुचाकीवरून मळकर्णेहून केपेच्या दिशेने येत असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले़ या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ स्थानिकांनी १0८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला़ रुग्णवाहिका घटनास्थळी आली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले़ डॉमनिक ओलिव्हेरा केपेचे उपनगराध्यक्ष कामिलो सिमॉईश यांचा भाचा असून ते विदेशात कामाला होते. दहा दिवसांपूर्वीच ते घरी आले होते़ (वार्ताहर)