क्राईम

By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:08+5:302015-07-03T23:00:08+5:30

हरमलात दीड किलो चरस जप्त

Crime | क्राईम

क्राईम

मलात दीड किलो चरस जप्त
दोघांना अटक : पेडणे पोलिसांची कारवाई
पेडणे : पेडणे पोलिसांनी गुरुवारी रात्री आगरवाडा व हरमल येथे छापा टाकून दोन नेपाळी युवकांकडून दीड कीलो चरस जप्त केला़ यामध्ये कुशाल गणेश पुरी व विजय बालबहादूर लामा या दोघांना अटकही करण्यात आली़ या चरसाची बाजारात दोन लाख रुपये किंमत आहे.
याबाबत पेडणे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी सांगितले की, गुरुवार, दि़ २ रोजी रात्री ११ वाजता आगरवाडा-चोपडे जंक्शनवर पोलीस पेट्रोलिंग करत असताना संशयावरून कुशाल गणेश पुरी (२४, मूळ बनेश्वर ३४, काठमांडू, नेपाळ) या युवकाला ताब्यात घेतले़ या वेळी त्याने आपण हरमल येथे एका रेस्टॉरंटमध्ये जात असल्याचे सांगितले़ पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो २१६ ग्रॅम चरस सापडला. त्याची किंमत दीड लाख रुपये होते.
पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर रामानंद, पोलीस कॉन्स्टेबल श्याम पार्सेकर, संदीप गावडे व रूपेश हरमलकर यांनी ही कारवाई केली़
दरम्यान, ३ रोजी पहाटे पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई यांना हरमल येथील रेस्टॉरंटमध्ये एका संशयिताकडे चरस असल्याची माहिती मिळाली. त्यावर पोलिसांनी तेथे छापा टाकला असता विजय बालबहाद्दूर लामा (२६, मूळ ललितपूर, नेपाळ) याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे ४२५ ग्रॅम चरस सापडला. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर रामानंद व अरुण देसाई पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
ओळी : पेडणे पोलिसांनी दोन नेपाळी युवकांकडून चरस जप्त केला. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक किशोर रामानंद व इतर. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

Web Title: Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.