क्राईम

By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:54+5:302015-07-13T01:06:54+5:30

मारहाण प्रकरण;

Crime | क्राईम

क्राईम

रहाण प्रकरण;
संशयितांना जामीन मंजूर
मडगाव : कुंकळ्ळीच्या नगरसेविका पोलिता कार्नेरो यांना मारहाण केल्याचा आरोप असलेल्या अमर प्रभुदेसाई व रिता प्रभुदेसाई या पती-पत्नीला दक्षिण गोव्याच्या प्रधान सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी सशर्त जामीन मंजूर केला. सरकार पक्षाच्या वतीने वकील सरोजिनी सार्दीन यांनी बाजू मांडली.
१ जुलै रोजी दुपारी मारहाणीची ही घटना घडली होती. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून संशयितांनी मारहाण केल्याची तक्रार कार्नेरो यांनी कुंकळ्ळी पोलिसांत दिली होती. भादंसंच्या ३२३, ५0४, ५0६ (२) व ५0९ कलमांतर्गत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे़ दोन्ही संशयितांना दहा हजार रुपयांची हमी व तितक्याच रकमेच्या हमीदाराच्या अटीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी)

Web Title: Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.