क्राईम फोल्डर

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30

कोराडीतील मुलगी बेपत्ता

Crim folder | क्राईम फोल्डर

क्राईम फोल्डर

राडीतील मुलगी बेपत्ता
नागपूर : कोराडीतील १६ वर्षीय मुलगी शनिवारी सायंकाळी बेपत्ता झाली. तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.
---
सदरमध्ये तरुणीचा विनयभंग
नागपूर : दोन महिलांच्या वादात हस्तक्षेप करून तिघांनी एका तरुणीचा विनयभंग केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आकाश प्रकाश पालेवार (वय २५), लखन पालेवार आणि राजेश जगदीश सूर्या (वय ३१, रा. सदर) अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित तरुणीचा (वय १९) शनिवारी रात्री ९.३० वाजता शेजारच्या महिलेसोबत वाद सुरू होता. उपरोक्त आरोपी तेथे आले आणि त्यांनी तरुणीला शस्त्राने मारण्याची धमकी देऊन तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आकाश आणि राजेशला अटक केली. लखनचा शोध सुरू आहे.
---
रेल्वे लाईनवर महिलेचा मृतदेह
नागपूर : रविवारी रात्री ८ च्या सुमारास मानकापूरचे मागे रेल्वे लाईनवर एका महिलेचा मृतदेह आढळला. तिची ओळख पटलेली नाही.
बाजीराव बकाराम कळवे यांनी दिलेल्या सूचनेवरून कोराडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली पुढील तपास सुरू आहे.
-----
गळफास लावून आत्महत्या
नागपूर : जरीपटक्यातील सुयोगनगरात राहणारे प्रमोद अरुण करवडे (वय ४२) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. रंजना प्रमोद करवडे
यांच्या सूचनेवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
---

Web Title: Crim folder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.