क्राईम फाईल

By Admin | Updated: June 2, 2015 01:13 IST2015-06-02T01:13:06+5:302015-06-02T01:13:06+5:30

कळमन्यात तरुणाने लावला गळफास

Crim file | क्राईम फाईल

क्राईम फाईल

मन्यात तरुणाने लावला गळफास
नागपूर : पंकज रामचंद्र देशमुख (वय ३०, रा. विजयनगर, कळमना) यांनी गळफास लावून आत्महत्या केली़ सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मुकेश केशवराव काटकर यांच्या सूचनेवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे़
----
कळमन्यात मृतदेह आढळला
नागपूर : कळमन्याच्या धान्यबाजाराजवळ माणिक देवदास गायकवाड (वय ४०) यांचा मृतदेह सोमवारी दुपारी १२.३० ला आढळला. पामाजी रामजी मल्लेवार (वय ६४, रा़ पारडी, चंद्रनगर) यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. गायकवाडचा मृत्यू कशाने झाला, त्याचा शोध घेतला जात आहे़
---
सासऱ्याच्या घरासमोर जावयाची आत्महत्या
नागपूर : सासऱ्याच्या घरासमोरच्या विहिरीत उडी घेऊन एका जावयाने आत्महत्या केली. संदीप विजय रायपुरे (वय ३८, रा. बाबानगर, गौरी तलाव, चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे. हुडकेश्वरमधील नीलकमल सोसायटीत त्याचे सासरे मारोती शेंडे राहतात. रविवारी तो त्यांच्याकडे आला. मध्यरात्री १ च्या नंतर तो घराबाहेर पडला. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास संदीपचा मृतदेह शेंडे यांच्या घरासमोरच्या विहिरीत आढळला. राजश्री संदीप रायपुरे (वय ३४) यांच्या माहितीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे़

Web Title: Crim file

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.