क्राईम फाईल
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:07+5:302015-02-16T23:55:07+5:30
एलसीडी प्रोजेक्टरची चोरी

क्राईम फाईल
ए सीडी प्रोजेक्टरची चोरी नागपूर : रामदेव बाबा महाविद्यालयाच्या लॅबमधील ५४ हजारांचे एलसीडी प्रोजेक्टर चोरट्याने लंपास केले. रविवारी दुपारी ४ वाजता ही घटना उघडकीस आली. प्रा. नितीन प्रभाकर नारखेडे (वय ३८, रा़ सरोजनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. ---कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यूनागपूर : पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. हरिदास ताराचंद गजभिये (वय ४३) असे मृताचे नाव आहे. वैनगंगानगरातील (चुनाभट्टी) कार्यालयात ते लिपिक म्हणून कार्यरत होते. अतिरिक्त काम असल्यामुळे ते रविवारी रात्री कार्यालयात गेले. आज सकाळी घरच्या मंडळींनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. प्रतिसाद न मिळाल्यामुळे घरच्यांनी कार्यालय गाठले असता गजभिये मृतावस्थेत आढळले. वैशाली हरिदास गजभिये (वय ३४) यांच्या माहितीवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.--- तरुणीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू नागपूर : कळमन्यातील कामनानगर क्रॉसिंगवर रेल्वेची धडक बसल्यामुळे पुष्पा उमनलाल यादव (वय १८, रा. विजयनगर) हिचा मृत्यू झाला. आज सकाळी ७.२० वाजता ही घटना उघडकीस आली. तिचा भाऊ ओकेश (वय २३) याच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. ----