क्रिकेटर एस. श्रीसंत निवडणूक लढविणार
By Admin | Updated: March 25, 2016 22:39 IST2016-03-25T22:39:18+5:302016-03-25T22:39:18+5:30
क्रिकेटर एस.श्रीसंत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. केरऴ विधानसभा निवडणुकीसाठी त्याला भाजपने उमेदवारी दिली आहे.

क्रिकेटर एस. श्रीसंत निवडणूक लढविणार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - क्रिकेटर एस.श्रीसंत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. केरऴ विधानसभा निवडणुकीसाठी त्याला भाजपने उमेदवारी दिली आहे.
दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत केरळ विधानसभा निवडणुकीसाठी एस.श्रीसंत याच्यासह ५१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. एस. श्रीसंत याला तिरुवानंतपुरम मतदारसंघातून उमेवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एस. श्रीसंत क्रिकेटच्या मैदानानंतर आता राजकीय मैदानात दिसणार आहे.