शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र जडेजाची पत्नी गुजरात निवडणुकीच्या मैदानात; रिवाबाला भाजपकडून मिळाले तिकीट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 11:44 IST

Rivaba Ravindra Jadeja : मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या रिवाबा मूळच्या गुजरातमधील राजकोट येथील आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची धावपळ सुरू आहे. यातच गुरुवारी भाजपने पहिली यादी जाहीर केली. यामध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना भाजपने जामनगर उत्तर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तीन वर्षांपूर्वी रिवाबा जडेजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या रिवाबा मूळच्या गुजरातमधील राजकोट येथील आहेत.

गेल्या मंगळवारी गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुजरात निवडणुकीसंदर्भात भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीनंतर आता भाजपने गुजरात निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जारी केली आहे. गुजरात भाजपचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी उमेदवारांची घोषणा केली. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबालाही तिकीट देण्यात आले आहे. या जागेचे विद्यमान आमदार भाजपचे धर्मेंद्रसिंह जडेजा आहेत, मात्र पक्षाने रिवाबा यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. 

दुसरीकडे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भूपेंद्र सिंह चुडासामा आगामी विधानसभा विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना पत्र लिहून निवडणूक न लढवण्याची विनंती केली आहे. या सर्वांनी आपला निर्णय पक्षनेतृत्वालाही कळवला आहे. दुसरीकडे, विजय रुपाणी सरकारमध्ये मंत्री राहिलेले सौरभ पटेल आणि प्रदीप सिंह जडेजा यांचीही निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. आतापर्यंत एकूण आठ माजी मंत्र्यांनी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

टॅग्स :ravindra jadejaरवींद्र जडेजाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा