क्रिकेटर मोहम्मद शामीला पितृशोक

By Admin | Updated: January 27, 2017 17:03 IST2017-01-27T16:47:34+5:302017-01-27T17:03:02+5:30

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांचे वडिल तौसीफ अहमद यांचे निधन झाले

Cricketer Mohammed Shamily Pitrushak | क्रिकेटर मोहम्मद शामीला पितृशोक

क्रिकेटर मोहम्मद शामीला पितृशोक

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांचे वडिल तौसीफ अहमद यांचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तौसिफ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वींच त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमी उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील सहसपुर अलीनगरमधील मुळ गावी पोहचणार आहे. नमाज अदा केल्यानंतर त्यांच्या दफनविधी करण्यात येणार आहे.

दरम्यान, शमीचे वडिल काही महिन्यांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गुरुग्राम येथे ऑपरेशन करण्यात आले होते.

Web Title: Cricketer Mohammed Shamily Pitrushak