शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

धोनीनं घेतला होता 'भारत बंद'मध्ये सहभाग? जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 11:10 AM

महेंद्रसिंग धोनीचा पेट्रोल पंपावरील फोटो सोशल मीडियावरील व्हायरल

नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काल काँग्रेसनं भारत बंद पुकारला होता. काँग्रेसच्या या बंदला 21 पक्षांनी पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर आता भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचापेट्रोल पंपावरील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत धोनीसोबत त्याची पत्नी साक्षीदेखील दिसत आहे. धोनीनंदेखील भारत बंदमध्ये सहभाग घेतला होता, असा दावा केला जात असून हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर होत आहे. अरुण ठाकूर नावाच्या एका व्यक्तीनं ट्विटरवर हा फोटो अपलोड केला होता. मात्र काही वेळात त्यांनी हा फोटो डिलीट केला. अरुण कुमार शिमल्याचे रहिवासी असून ते हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडियाचे सदस्य आहेत. ठाकूर यांनी ट्विट केलेला फोटो नीट पाहिल्यास तो भारत बंद दरम्यान काढण्यात आलेला नाही, हे लक्षात येऊ शकेल. कारण ट्विट करण्यात आलेला आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो रात्रीच्या वेळी काढण्यात आलेला आहे. तर भारत बंद सोमवारी दिवसभर पाळला गेला. याशिवाय इंटरनेट शोध घेतल्यावरदेखील अशी कोणतीही बातमी उपलब्ध होत नाही. 

इंटरनेटवर या फोटोचा शोध घेतल्यास तो ऑगस्ट महिन्यातील असल्याची माहिती मिळते. त्यावेळी धोनी एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी शिमल्याला गेला होता. धोनी त्यावेळी काही वेळ पेट्रोल पंपावर थांबला होता. हा पेट्रोल पंप शिमल्यातील विकास नगरमध्ये आहे. 29 ऑगस्ट रोजी धोनी पेट्रोल पंपावर आल्याची माहिती पेट्रोल पंपाच्या मालकानं दिली. त्यावेळी धोनीसोबत त्याची पत्नी आणि काहीजण होते, असंही त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंह धोनीBharat Bandhभारत बंदFuel Hikeइंधन दरवाढPetrol Pumpपेट्रोल पंप