शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Harbhajan Singh : पंजाब निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश करणार हरभजन सिंग? क्रिकेटरनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 09:46 IST

हरभजन सिंग एखाद्या पक्षात जाऊ शकतो, अशी अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी, तो काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचे वृत्त आले होते.

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता अफवा पसरायलाही सुरुवात झाली आहे.  भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर हरभजन सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी एक बातमी समोर आली होती. मात्र, हरभजनने या वृत्तांचे खंडन करत, ती 'फेक न्यूज' असल्याचे म्हटले आहे. (Harbhajan Singh Joins BJP?)

खरे तर, एका मीडिया आउटलेटने सूत्रांचा हवाला देत, पंजाब निवडणुकीपूर्वी हरभजन सिंग आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) भाजपमध्ये सामील होऊ शकतात, असा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना ही फेक न्यूज असल्याचे हरभजनने म्हटले आहे. मात्र, अद्याप युवराजच्या बाजूने यावर कसल्याही प्रकारचे उत्तर देण्यात आलेले नाही.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हरभजन सिंग पुढील आठवड्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. यानंतर तो राजकारणात प्रवेश करण्याची  शक्यता असल्याचा अंदाज लावला जात होता. तीन वर्षांपूर्वी एक मुलाखतीत हरभजन सिंग म्हणाला होता की, त्याला एखाद्या पक्षाने ऑफर केले, तर तो राजकारणात नक्की जाईल. कारण पंजापमधील लोकांसाठी त्याची काही तरी करण्याची इच्छा आहे.

गेल्या निवडणुकीवेळीही पसरली होती अफवा - हरभजन सिंग एखाद्या पक्षात जाऊ शकतो, अशी अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी, तो काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचे वृत्त आले होते. तेव्हाही त्याने हे वृत्त फेटाळून लावले होते. तेव्हा, हरभजन काँग्रेसमध्ये जाऊ शकतो आणि त्याला जालंधरमधून उमेदवार मिळू शकते, असे म्हटले गेले होते.

टॅग्स :Harbhajan Singhहरभजन सिंगBJPभाजपाPunjabपंजाबElectionनिवडणूकPoliticsराजकारण