स्मशानभूमीतील टिनशेड गायब

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:11+5:302015-09-01T21:38:11+5:30

स्मशानभूमीतील टिनशेड गायब

The crematoriums are missing | स्मशानभूमीतील टिनशेड गायब

स्मशानभूमीतील टिनशेड गायब

मशानभूमीतील टिनशेड गायब
डोंगरगाववासी त्रस्त : दु:खाच्या प्रसंगीही वेदनाच, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
सुरेख नखाते ० पचखेडी
मनुष्याचा मृत्यू अटळ असला तरी मात्र मृतदेहावर योग्यरीत्या अंत्यविधीचे सोपस्कार पार पडावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. परंतु पावसाळ्याच्या दिवसात चक्क छत्री घेऊन मृतावर अंत्यविधी पार पाडावा लागत असल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगावलगतच्या डोंगरगाव येथील स्मशानभूमीचे टिनशेड गायब असल्याने दु:खाच्या प्रसंगीही आप्तांना नाहक वेदनाच सहन कराव्या लागत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
डोंगरगाव येथे जवळपास तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निधीतून स्मशानभूमीतील टिनशेड व ओट्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु अल्पावधीतच टिनशेड कुठे गायब झाले, हे कळायला मार्ग नाही. नागरिकांना अंत्यविधीच्या वेळेस कसेबसे छत्री घेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यातच कधी कधी मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत राहून दुसऱ्या दिवशी परत जाळण्याची वेळ येते. स्मशान भूमीतील टिनशेड उडाल्यामुळे ही स्थिती उद्भवते. मृत शरीराची ही थट्टा नव्हे काय, असा सवाल डोंगरगाववासी करीत आहेत.
स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी साधा हॅण्डपंपही नाही. अंत्यविधीसाठी दाखल झालेल्या नागरिकांना एक कि.मी. अंतरावरील विहिरीतून पाणी आणूनच पुढील सोपस्कार पार पाडावे लागतात, अशी माहिती पोलीसपाटील दाजीबा जुनघरे यांनी दिली. डोंगरगाव गट ग्रामपंचायतअंतर्गत डोंगरगाव, डोडमा व नवरगाव या तीन गावांचा समावेश आहे. त्यातही ग्रामपंचायत कार्यालय डोडमा येथे असल्याने डोंगरगावमधील समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. जवळपास एक हजार लोकसंख्या असलेल्या डोंगरगावसह परिसरातील अन्य गावातील नागरिक याच स्मशानभूमीचा वापर करतात.
पाणी, रस्ता या मूलभूत समस्यांसह ओट्यांचीही बिकट अवस्था असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. दहनशेडवरील टिनपत्रे पूर्णत: जीर्ण होऊन उडाली. शिवाय परिसरात सर्वत्र कचरा व झुडपे वाढली असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अंत्यविधी करायचा कुठे, असा संतप्त सवाल डोंगरगाववासी करीत आहेत.

Web Title: The crematoriums are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.