शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

माकपची याचिका : निवडणूक रोख्यांना सुप्रीम कोर्टात आव्हान, न्यायालयाची केंद्राला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:48 IST

निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाला योग्य निधी उपलब्ध व्हावा म्हणून केंद्र सरकारने आणलेली निवडणूक रोखे योजना रद्द करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

नवी दिल्ली - निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाला योग्य निधी उपलब्ध व्हावा म्हणून केंद्र सरकारने आणलेली निवडणूक रोखे योजना रद्द करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने शुक्रवारी केंद्राला नोटीसही बजावली.सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठाने ही याचिका सुुनावणीस घेण्याचे मान्य केले आहे. राजकीय पक्षांना जो निधी मिळतो त्या व्यवहारात निवडणुक रोखे योजनेमुळे पारदर्शकता येईल असा दावा करत मोदी सरकारने ही योजना जाहीर केली.या योजनेला अन्य राजकीय पक्षांनी केलेला तीव्र विरोध व निवडणुक आयोगाने या योजनेबद्दल व्यक्त केलेली नाराजी याला न जुमानता मोदी सरकारने ही योजना अमलात आणण्याचे ठरविले. निवडणुक रोख्यांच्या योजना हे प्रतिगामी पाऊल असल्याची टीका निवडणूक आयोगाने केली होती.याचिकेत म्हटले आहे की, निवडणूक रोख्यांची योजना अमलात आल्यास राजकीय पक्षांना देणग्या देण्याच्या व्यवहारातील पारदर्शकताच संपुष्टात येईल. कोणत्या राजकीय पक्षाला किती देणग्या देण्यात आल्या, याची माहिती फक्त उद्योजक, कंपन्या व सरकारपुरतीच मर्यादित राहिल.योजनेचे निकषनिवडणूक रोखे योजनेतील तरतुदींनूसार एक हजार, दहा हजार, एक लाख, दहा लाख, एक कोटी यांच्या पटीत हे रोखे काढण्यात येणार आहेत. ते स्टेट बँक आॅफ इंडियाच्या विशिष्ट शाखांमध्ये उपलब्ध असतील. देणगीदार हे रोखे आपल्या आवडत्या पक्षाला देणगी म्हणून देऊ शकतील. त्यानंतर पंधरा दिवसांनी या रोख्यांची रक्कम संबंधित राजकीय पक्षाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल ़ नुकत्याच झालेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या किमान एक टक्के मते मिळालेल्या राजकीय पक्षांनाच त्याद्वारे देगण्या मिळू शकतील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतGovernmentसरकार