गाई वाचवताय, मग महिलांकडे दुर्लक्ष का ? - जया बच्चन
By Admin | Updated: April 12, 2017 14:14 IST2017-04-12T14:10:00+5:302017-04-12T14:14:21+5:30
अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा रुद्रावतार पुन्हा एकदा राज्यसभेत पाहायला मिळाला

गाई वाचवताय, मग महिलांकडे दुर्लक्ष का ? - जया बच्चन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा रुद्रावतार पुन्हा एकदा राज्यसभेत पाहायला मिळाला. जया बच्चन यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करत सरकारला यासाठी लवकरात लवकर पावलं उचलण्याचं आवाहन केलं. याआधीदेखील जया बच्चन यांनी अनेकदा महिला सुरक्षेचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला आहे. निर्भया घटनेवर बोलताना जया बच्चन भावनिक झाल्या होत्या.
"महिला सुरक्षेसाठी काही मोठी आणि कठोर पाऊलं उचलण्याची गरज आहे. तुम्ही गाईंना वाचवण्यासाठी पाऊलं उचलत आहात. पण इथे महिलांवरील अत्याचार कमी होत नाही आहेत", असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे. जया बच्चन यांनी सरकारला महिलांच्या सुरक्षेसाठी युद्धस्तरावर काम करण्याचं आवाहन केलं आहे.
Must take steps for protection of women aggressively. You are protecting cows but atrocities being commited on women-Jaya Bachchan, SP in RS pic.twitter.com/ES3sx5AHhW
— ANI (@ANI_news) April 12, 2017
जया बच्चन यांनी जेव्हा सभागृहात महिलांशी संबंधित मुद्दा उपस्थित केला तेव्हा इतर सदस्यांनी टेबलावर थाप मारुन त्यांचं समर्थन केलं. जया बच्चन राज्यसभेत समाजवादी पक्षाकडून खासदार आहे. आपलं मत परखडपणे मांडण्यासाठी त्यांना ओळखलं जातं.